---Advertisement---

शेगांमध्ये वरली मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई!

---Advertisement---

शेगांव (डि ललित) : शेगांव शहरातील सेंट्रल बँक चौक परिसरात वरली मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीस ताब्यात घेतले. घटनेची नोंद 09 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली.

फिर्यादी विजय गजानन वारुळे (नेमणूक – गु.शा. बुलढाणा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभुते टी स्टॉलसमोर आरोपी अमोल ज्ञानदेव गोळे (वय 33, रा. गौलखेड, ता. शेगांव) हा वरली मटका जुगार खेळत असल्याची पक्की खबर मिळाली होती. त्यावरून पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये आरोपीच्या ताब्यातून वरली मटका आकडे लिहिलेली चिठ्ठी, एक पेन (किंमत 5 रुपये), रोख रक्कम 1,510 रुपये असा एकूण 1,515 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

घटनेची नोंद त्याच दिवशी रात्री 10.10 वाजता करण्यात आली. या प्रकरणात दाखल अधिकारी पोहे.का. चारुशीला गवई असून पुढील तपास पो.हे.का. श्याम आघाव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार धंद्यावर पोलिसांची कारवाई पुढील काळात अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment