शेगांव (डी ललित): शेगांव येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडलेला अकोला जिल्ह्यातील एक युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कायमस्वरूपी मिसिंग क्र. 11/2026 नोंद करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे.
नागझरी महादेव मंदिरासमोरून युवक बेपत्ता
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिसिंग व्यक्तीचे नाव सत्यम अनंतराव काळे (वय २२ वर्ष) असे असून तो मूळ रा. तामसीवाडेगाव ता. बाळापूर जि. अकोला, सध्या ह.मु. डाबकी रोड, अकोला येथे राहत होता.
दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5.22 वाजता नागझरी महादेव मंदिरासमोरून तो बेपत्ता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित युवकाने “मी शेगावला दर्शनासाठी जात आहे” असे सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र त्यानंतर तो परत घरी आला नाही.
कुटुंबीयांनी शेगांव परिसरात शोध घेतला, मात्र त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नसल्याने पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली.(युवा क्रांती वृत्तसेवा)







