---Advertisement---

अनोळखी इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन!

---Advertisement---

शेगांव (डी ललित): आज शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास खंबा नंबर ५८४/८ जवळ एक अनोळखी इसम ट्रेन क्रमांक ASLS मालगाडीला धडकून गंभीर जखमी झाला. या अपघातात संबंधित इसमाच्या डाव्या कानाजवळील कवटी फुटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेबाबत अप स्थानक प्रबंधक यांच्या मेमोवरून रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू क्रमांक ५६/२५, कलम १९४ BNSS अन्वये नोंद करण्यात आली आहे.

मृत इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : उंची अंदाजे ५ फूट ५ इंच, रंग गोरा, शरीरयष्टी सडपातळ, डोक्यावरील केस काळे-पांढरे मिश्रित, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे बारीक, दात पूर्ण, मिशी बारीक असून उजव्या दंडावर “ॐ” गोंदलेले (टॅटू) आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवा. पांडुरंग वसु (मो. ९८८११०८४०७) हे करीत आहेत. सदर इसमाची ओळख पटल्यास किंवा त्याबाबत काही माहिती असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment