---Advertisement---

शेगावच्या विकासासाठी दिल्लीमध्ये ठोस पुढाकार !

New Delhi Meeting
---Advertisement---

नई दिल्ली (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव हे विदर्भातील एक प्रमुख आध्यात्मिक व व्यापारी केंद्र आहे. येथे दररोज सुमारे १७,००० प्रवाशांची ये-जा होत असते. मात्र काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा नसल्यामुळे श्रद्धाळू व स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही बाब गांभीर्याने घेत आज नवी दिल्ली येथे
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव, रविकांतदादा पाटील (सदस्य – ZURCC), राजेश अग्रवाल (अनुमोदित पार्षद व सदस्य – DRUCC), उमेश पाटील, उदय उगले यांनी माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली.

शेगावचे रेल्वे स्टेशन हे A दर्जाचे असताना देखील त्या दर्जाच्या मानाने येथे पुरेशा रेल्वे गाड्यांना थांबा नाही. तसेच प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधाही अपेक्षित प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेगाव रेल्वे स्टेशनला अधिकाधिक गाड्यांचा थांबा लवकरात लवकर मंजूर होईल, अशी आमची अपेक्षा आहे.

या गाड्यांना थांबा मिळाल्यास शेगाव शहरातील नागरिकांबरोबरच बाहेरील प्रवाशांनाही मोठा फायदा होईल. तसेच यामुळे शेगावमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक उद्योग, व्यापार व इतर व्यवसायांवर होऊन शहराचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल, असा विश्वास आहे.

रविकांतदादा पाटील
(सदस्य – ZURCC)

या बैठकीत शेगाव रेल्वे स्टेशनच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार खालील ५ महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना शेगाव येथे थांबा देण्याची ठाम मागणी करण्यात आली:

  • 22109 / 22110 – बल्लारशाह–मुंबई (LTT) एक्सप्रेस
  • 20625 / 20626 – चेन्नई–भगत की कोठी (जोधपूर) एक्सप्रेस
  • 19021 / 19022 – उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस
  • 17605 / 17606 – काचिगुडा–भगत की कोठी (जोधपूर) एक्सप्रेस
  • 12719 – अजमेर–हैदराबाद एक्सप्रेस

माननीय रेल्वे मंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच तांत्रिक बाबींची तपासणी करून आवश्यक बदल केले जातील, असे आश्वासन दिले आहे.

शेगावच्या हक्कासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी आमचा हा प्रयत्न सातत्याने सुरू राहील!

राजेश मुरारीलालजी अग्रवाल
(सदस्य – DRUCC, भुसावळ)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment