शेगांव (डी ललित) : शहरातील मोदी नगर परिसरातील एक युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, संबंधित प्रकरणी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. बेपत्ता युवकाचे शेवटचे दर्शन सोपीनाथ महाराज मंदिर परिसरात झाल्याची माहिती समोर आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास, फिर्यादीस तिचा भाऊ प्रविण रामदास निंबाळकर (रा. मोदी नगर, शेगाव) यांनी फोनद्वारे माहिती दिली की, बेपत्ता युवक विजय हा शेगाव येथील सोपानाथ महाराज मंदिराजवळ दिसला होता, मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही.
याबाबत फिर्यादीने तिच्या मुलगा विजयच्या मोबाईल क्रमांक 9075154915 वर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. सुरुवातीला मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे फोन बंद असावा, असा समज करून फिर्यादीने प्रतीक्षा केली. मात्र, बराच वेळ उलटूनही विजय घरी न परतल्याने फिर्यादीने परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु त्याचा काहीच मागमूस लागला नाही.
दरम्यान, युवक अद्यापपर्यंत परत न आल्याने फिर्यादीने शेगाव पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहून तोंडी तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांनी मिसिंगची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल क्रमांक निलेश गाडगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पोलीसांकडून युवकाचा शोध सुरू असून, नागरिकांना संबंधित युवकाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(युवा क्रांती वृत्तपत्र )







