एफ. एम. काशेलानी इंग्लिश स्कूल शेगांवच्या विद्यार्थिनींनीची विभागीय स्तरावर निवड !
मलकापूर (सचिन कडूकर) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत एफ. एम. काशेलानी इंग्लिश स्कूल शेगांवच्या विद्यार्थिनींनी उज्ज्वल कामगिरी केली.
या स्पर्धेत कु. रश्मी इंगळे व कु. वेदांती पारोडे यांनी अनुक्रमे सुवर्णपदक मिळवत प्रथम क्रमांक, तर कु. श्रुती वाकळे व कु. स्नेहल कापसे यांनी तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळवले.
विशेष म्हणजे, रश्मी इंगळे व वेदांती पारोडे यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
या यशानंतर शाळेचे अध्यक्ष मनोज काशेलानी, संचालक कुणाल काशेलानी, सहसंचालक शुभम देशमुख, सल्लागार संचालिका भूमिका काशेलानी आणि मुख्याध्यापिका योगिता गावंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक प्रेम सावळे सर यांचे अभिनंदन केले.
“विद्यार्थ्यांच्या शिस्त, जिद्द व समर्पणामुळे मिळालेलं हे यश संपूर्ण शाळेसाठी गौरवाचं आहे,” असे मत क्रीडा शिक्षक प्रेम सावळे यांनी व्यक्त केले.
स्पर्धा लि. भो. चांडक विद्यालय, मलकापूर येथे पार पडली.











