शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगांव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली युवकांचा मोठ्या संख्येने प्रवेश झाला. लोकप्रिय आमदार डॉ. संजय कुटे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून संतोष खंडारे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य युवकांनी भाजपात प्रवेश केला.
या प्रसंगी आमदार डॉ. संजय कुटे यांनी सर्व युवकांचे पक्षात स्वागत करताना त्यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करून सत्कार केला. या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला नवचैतन्य मिळाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला भाजपा नेते व माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल, पुरुषोत्तम शेगोकार, पांडुरंग बुच, रविकांतदादा पाटील, संजय कलोरे, राजू अग्रवाल, नितीन शेगोकार, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन ढमाळ, नितीन कराळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेशानंतर झालेल्या सभेत उपस्थित युवकांनी येऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपाच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. “विकासासाठी भाजपा, विश्वासासाठी आमदार डॉ. संजय कुटे” असा एकमुखी जयघोषही यावेळी देण्यात आला.
अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक ६ मधील समीकरणे भाजपाच्या बाजूने झुकताना दिसत असून, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पक्षावरील वाढता विश्वास आगामी निवडणुकीत भाजपासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
या वेळी रायली फैल परिसरातील संतोष खंडारे, सहदेव शेगोकार, महादेव शेगोकार, सोनू शेगोकार, इंद्र चंदनशिव, अवि शेगोकार, वैभव गायकवाड, अभिजित शेगोकार, दीपक शेगोकार, भागवत राजुस्कर, संकेत ताले, आशिष चातुरकर, गजानन चातुरकर, मुकेश शेगोकार, प्रकाश शेगोकार, प्रकाश चंदनशिव, जय गायकवाड, वैभव आयले, पांडुरंग राजुस्कर, मार्तंड राजुस्कर, विलास ताडे, अर्जुन दरपे, पवन मागटे, महेश गुजर आदींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.










