मुंबई (युवा क्रांती वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना गटात मोठी भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 20 हजार शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली असून 55 शाखाप्रमुखांनी सामूहिक राजीनामे दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद, संघटनातील नाराजी आणि भाजपची सक्रिय राजकीय हालचाल यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील अनेक शाखांमध्ये असंतोष वाढला असून शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथीचे संकेत दिसत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठ्या घटना घडण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.











