संग्रामपूर (आकाश बोरसे) : शासन हमी भावाने नाफेड आणि कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार वरवट (बकाल) येथे आज सोयाबीन खरेदीचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन काटापूजन करून तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते झाले.
“प्रथम सोयाबीन विक्री करणारे शेतकरी तेल्हारकर यांचा शेलाटोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार बाजार समितीचे सभापती तसेच भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव पाटील (अवचार) यांच्या हस्ते झाला.”
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती
या प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती संजीव इंगळे, संचालक उमेश टावरी, माजी उपसभापती व संचालक श्रीकृष्ण बोरसे, विठ्ठल वखारे, अभयसिंग मारोडे, संग्रामपूर ख.वि. संस्थेचे अध्यक्ष विश्वासराव वरणकार, उपाध्यक्ष गणेश भुते, भाजपाचे जेष्ठ नेते पांडुरंग हागे, स्वप्नील बाप्पू देशमुख, बाजार समितीचे सचिव पंकज मारोडे, संदीप माटे, सचिन टिकार, मंगेश गोतमारे, खिरोडकर यांसह हमाल बांधव आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची मोठी नोंदणी
संग्रामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीकडे १२०० हून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन आणून लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती भाऊराव पाटील (अवचार) यांनी केले.











