---Advertisement---

बावनबीरजवळ पुलावर एसटी बस अडकली; टायर थेट बाहेर लटकला, मोठा अनर्थ टळला

“बावनबीरजवळ पुलावर अडकलेली एसटी बस”
---Advertisement---

बावनबीर (आकाश बोरसे) : बावनबीर गावाजवळील इंदिरा गांधी विद्यालय शाळेजवळ असलेल्या पुलावर आज शुक्रवार, दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाची बस अडकली. बुलढाणा येथे जाणारी एमएच १४ बीटी ४५३२ क्रमांकाची एसटी बस पुलावरून जात असताना बसचा समोरचा एक टायर थेट पुलाबाहेर लटकला. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

बसचा टायर पुलाबाहेर लटकताच क्षणभरासाठी प्रवाशांचा जीव कंठाशी आला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने आणि वेळीच बस थांबवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दोन वर्षांपासून अपूर्ण पुलाचे काम

सदर पुलाचे काम गेल्या तब्बल दोन वर्षांपासून अपूर्ण असून काम अत्यंत कासवगतीने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पुलावर संरक्षण भिंत, योग्य मार्गदर्शक चिन्हे आणि सुरक्षितता उपायांचा अभाव असल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

वाहतूक विस्कळीत, प्रशासनावर टीका

या घटनेनंतर काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी

“पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा भविष्यात जीवितहानी झाल्यास जबाबदारी प्रशासनाची असेल,” अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment