---Advertisement---

श्री गजानन महाराज भक्त परिवार विटा यांचे मंदिर परिसरात स्वच्छता अभियान!

---Advertisement---

शेगांव (डी ललित) : श्री संत गजानन महाराज यांच्या पावन चरणी सेवा म्हणून श्री गजानन महाराज भक्त परिवार, विटा (जिल्हा सांगली, तालुका खानापूर) येथील सेवेकऱ्यांनी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

या अभियानांतर्गत मंदिर परिसरातील रस्ते, प्रवेशद्वार, दर्शन रांगा, विश्रांती स्थळे तसेच आजूबाजूच्या परिसरात साचलेला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.

या उपक्रमात भक्त परिवारातील सदस्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवून सेवा भावनेतून कार्य केले. अशा उपक्रमांमुळे मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहण्यास मदत होत असून भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविण्याचा संकल्प भक्त परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आला. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment