---Advertisement---

T20 World Cup 2026 मध्ये मोठा ट्विस्ट! पाकिस्तान बाहेर झाला तर कोणत्या संघाला मिळणार संधी?

“T20 World Cup 2026 मध्ये पाकिस्तान बहिष्काराच्या चर्चेत”
---Advertisement---

(युवा क्रांती वृत्तसेवा) : पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या ICC T20 World Cup 2026 संदर्भात मोठा राजकीय व क्रीडा वाद निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेश संघाला आयसीसीने स्पर्धेतून वगळले, आणि त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाला संधी देण्यात आली.

यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने आयसीसीविरोधात कुरघोडी सुरू केली आहे. PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी शनिवारी स्पष्ट केले की पाकिस्तान बांगलादेशच्या भूमिकेच्या बाजूने उभा आहे. या प्रकरणावर पाकिस्तान सरकार, पंतप्रधान आणि संबंधित यंत्रणांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

मोहसिन नक्वी यांची आयसीसीवर टीका

“पाकिस्तान आयसीसी स्पर्धांमध्ये हायब्रिड मॉडेलनुसार खेळत आहे. बांगलादेशलाही तशीच सवलत मिळायला हवी होती. मात्र आयसीसीने त्यांना पाठिंबा दिला नाही, जे पूर्णपणे चुकीचे आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नक्वी यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यास काय?

पाकिस्तानने यापूर्वीही अनेक वेळा आयसीसी स्पर्धांवर बहिष्काराची धमकी दिली आहे, मात्र प्रत्येक वेळी संघाने सहभाग घेतला आहे.
मात्र यावेळी जर पाकिस्तानने T20 World Cup 2026 खेळण्यास नकार दिला, तर त्यांची जागा ‘युगांडा’ संघ घेणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानचा गट आणि सामने

T20 World Cup 2026 साठी पाकिस्तानला गट ‘A’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात खालील संघांचा समावेश आहे:

  • 🇮🇳 भारत
  • 🇺🇸 अमेरिका
  • 🇳🇱 नेदरलँड्स
  • 🇳🇦 नामिबिया

पाकिस्तानचे नियोजित सामने:

  • 🗓️ 7 फेब्रुवारी – नेदरलँड्स विरुद्ध
  • 🗓️ 10 फेब्रुवारी – अमेरिका विरुद्ध
  • 🗓️ 15 फेब्रुवारी – भारत विरुद्ध
  • 🗓️ 18 फेब्रुवारी – नामिबिया विरुद्ध

संघाचे नेतृत्व सलमान अली आघा करत आहेत.

भारत–पाकिस्तान हायब्रिड करार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार:

  • भारताने आयोजित केलेल्या आयसीसी स्पर्धेत पाकिस्तान तटस्थ ठिकाणी खेळेल
  • पाकिस्तान यजमान असल्यास भारत तटस्थ ठिकाणी खेळेल

या करारानुसार पाकिस्तानचे सर्व T20 World Cup सामने श्रीलंकेत होतील.
संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत पोहोचला तरी हे सामनेही श्रीलंकेतच खेळवले जातील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment