मराठवाडा (युवा क्रांती वृत्तसेवा) : अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘दगाबाज रे’ या शेतकरी संवाद दौऱ्याची सुरुवात केली आहे. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
ठाकरे म्हणाले, “शेतकरी हा साधा, प्रामाणिक आणि संयमी असतो, पण त्याच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. मराठवाडा मोठ्या संकटातून जात असताना सरकार केवळ पाहणी आणि अभ्यासाच्या नावाखाली वेळ घालवत आहे. दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात मदतीच्या नावाखाली केवळ आश्वासनांचं ओझं वाढवलं जात आहे.”
ठाकरे यांच्या या संवाद दौऱ्याला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकरी मोठ्या संख्येने त्यांच्या भेटीला उपस्थित राहत आहेत.








