संग्रामपूर(आकाश बोरसे): पिंप्री काथरगांव गट ग्रामपंचायतीत आज उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया शांततेत आणि एकमताने पार पडली. मावळत्या उपसरपंच सौ. लीला संजय मुंडे यांनी नियोजित अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिल्यानंतर, नवनियुक्त उपसरपंच म्हणून सौ. कुसुम रामदास डाखोडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेला सरपंच सौ. सुवर्णा गणेश टापरे, ग्रामपंचायत सदस्य सौ. लीला संजय मुंडे, श्री. कडू सुखदेव कांबळे, श्री. विलास कंकाळ, सौ. पार्वताबाई हातेकर, सौ. प्रिया गोल्हर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्व सदस्यांनी एकमताने डाखोडे यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला.
निवडीनंतर नवनियुक्त उपसरपंच सौ. कुसुम रामदास डाखोडे यांचा ग्रामपंचायतीत सत्कार करण्यात आला. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित नागरिकांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पिंप्री काथरगांव ग्रामपंचायतीत झालेली ही अविरोध निवड ग्रामपंचायतीतील एकजूट आणि सहकार्याचे प्रतीक ठरली आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)











