---Advertisement---

आदिवासी म्हणजे आदी सनातन संस्कृतीचे वाहक – संत रामचरण महाराज!!

---Advertisement---

वसाली (ता. संग्रामपूर)(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. १४ मार्च – वसाली येथे भव्य फगवा संमेलन उत्साहात पार पडले असून या वेळी शबरीधाम अंबा आश्रम, मध्य प्रदेश येथील संत रामचरण महाराज यांनी “आदिवासी म्हणजे आदी सत्य सनातन हिंदू धर्माचे वासी आहेत” असे प्रतिपादन केले.

होळी नंतर साजरा होणारा फगवा हा पारंपरिक लोकोत्सव असून, वनवासी सेवा समिती जामोद व फगवा उत्सव समिती वसाली यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता वीर हनुमान मंदिर येथे आरतीनंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला.

संत रामचरण महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आदिवासी समाज हा प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान भोलेनाथ यांचे वंशज असून सनातन हिंदू धर्माशी त्यांचे नाते घट्ट आहे. “कंधों से उंची छाती नहीं होती, धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती… सनातन हिंदू धर्मच नाही राहिला तर जातीचे काय?” असे सांगत त्यांनी धर्मरक्षणासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले.

तसेच हिंदू धर्मावर होणाऱ्या आक्रमणांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करत, परधर्म स्वीकारू नये, आपल्या परंपरा व संस्कृती जपाव्यात, असेही त्यांनी नमूद केले. आगामी २२ मे रोजी दिल्लीतील लाल किल्ला येथे आयोजित डिलीस्टिंग मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनवासी सेवा समिती जामोदचे अध्यक्ष गणेशजी नथ्थाणी होते. प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री विष्णूजी देशमुख यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा उल्लेख करत हिंदू समाज एकत्र येण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या वेळी मंचावर चित्तरंजनजी राठी, बाळासाहेब काळे, गजाननराव सोलकर, राजेशजी झापर्डे, गोविंदजी बर्डे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र बोदडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजूभाऊ गांधी यांनी मानले.

कार्यक्रमाला स्थानिक सरपंच सिकंदर बाबर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मिलिंदजी जोशी, सचिनभाऊ देशमुख,प्रकाश बोदडे, प्रदीपभाऊ भुतडा,ओमजी संघवै,विश्वासभाऊ पाटील,विजय दहीकर,भाऊराव पाटील,शालिग्राम मानकर,रामेश्वर चोरे,अतुलजी बनारसे,विष्णू खडसे,जगदीशप्रसाद तिवारी,मगन माली,सोहन डूडवा, धनसिंग,कालू रावत व विश्व हिंदु परिषद,बजरंग दल,वनवासी कल्याण आश्रम,भारतीय मजदूर संघ व परीवार क्षेत्रातील विविध आयामाचे शेकडो कार्यकर्ते व हजारो वनवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment