गाई वासराला पुजूया, संस्कृती आपली जपूया, वसुबारसेला सर्वांनी, मिळून दिवाळी साजरी करूया!
आंचरवाडी (श्याम देशमुख) : काल, वसुबारसच्या शुभमुहूर्तावर आंचरवाडी येथे गोमातेचे पूजन उत्साहात व भक्तिभावाने पार पडले. हे पूजन भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. संतोष काळे पाटील व त्यांच्या पत्नी सौ. मनीषा ताई संतोष काळे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पूजनावेळी गोमातेबद्दलची निष्ठा आणि हिंदू संस्कृतीप्रती असलेले प्रेम याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. गावकरी आणि महिला वर्ग यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. श्री. केशव दत्तात्रय परिहार, श्री. वासुदेव नारायण परिहार, श्री. भगवान अश्रू परिहार, श्री. जालम महिपत परिहार, मुक्तत्यारसिंग लालसिंग परिहार, नामदेव सुगदेव सपकाळ, लक्ष्मण श्रीराम परिहार, विजय साहेबराव परिहार, रामेश्वर रामचंद्र परिहार, सुनील पांडुरंग परिहार, संजय जनार्दन परिहार, भुजनगराव लक्ष्मण शिंगणे, कुंडलिक सखाराम तिडके, पुरुषोत्तम सुगदेव परिहार, गजानन यादव परिहार, गणेश जरसिंग परिहार, संकेत रमेश परिहार, अविनाश संजय परिहार, प्रदीप पुरुषोत्तम परिहार, विनोद लक्ष्मण परिहार, मुरलीधर यादव परिहार, आत्माराम धोंडू परिहार, विलास ज्ञानेश्वर परिहार इत्यादींचा समावेश होता.
सौ. सरला शिवणारायन परिहार, सौ. लता पुरुषोत्तम परिहार, सौ. नंदा रामेश्वर परिहार, सौ. अनिता प्रदीप परिहार, सौ. सविता विष्णु कृहरे, सौ. दीपाली विनोद राऊत, सौ. स्वाती वासुदेव परिहार, सौ. लंकावती सखाराम गिरी, सौ. मीराबाई प्रल्हाद परिहार, सौ. ज्योती शिवराम राऊत, सौ. आश्विनी केशव परिहार आणि इतर अनेक महिलांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पडले. शेवटी सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी सण सुसंस्कृतपणे साजरा करण्याचा संकल्प केला.










