---Advertisement---

खामगाव अर्बन बँकेच्या दोन शाखांमध्ये प्रामाणिकतेची दोन उदाहरणे; जास्तीची रक्कम खातेदारांना परत करून दिला प्रामाणिकतेचा संदेश

---Advertisement---

शेगाव/वरवट बकाल (प्रतिनिधी): बँकिंग क्षेत्रातील विश्वास व पारदर्शकतेची जपणूक करत खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दोन शाखांतील कॅशियरांनी प्रामाणिकतेचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.

पहिली घटना – शेगाव शाखा श्रीराम नागरी पतसंस्थेचे कर्मचारी सुपेश विठ्ठल दळी यांनी संस्थेच्या खात्यात भरण्यासाठी रोख रक्कम खामगाव अर्बन बँकेच्या शेगाव शाखेत आणली होती. कॅशियर अनंत तिवडे यांनी रक्कम मोजताना तीमध्ये रु. 50,000/- जास्त असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही बाब शाखाधिकारी अजय माटे यांना कळवून संबंधितांना अतिरिक्त रक्कम परत केली.

दुसरी घटना – वरवट बकाल शाखा 30 जुलै 2025 रोजी वरवट बकाल शाखेत शैलेश जैस्वाल यांनी त्यांच्या करंट खात्यात रु. 3,97,000/- रोख जमा करण्यासाठी रक्कम पाठविली होती. मात्र, तीमध्ये रु. 40,000/- जास्त आल्याचे कॅशियर तेजराव पुंडे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित शाखाधिकारी यांना माहिती देऊन खातेदारास संपर्क साधला आणि त्यांना बँकेत बोलावून जास्तीची रक्कम परत केली. या प्रामाणिक कृतीबद्दल खातेदारांनी तेजराव पुंडे यांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

दोन्ही घटनांबाबत खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष विजय पुंडे यांनी कॅशियर अनंत तिवडे व तेजराव पुंडे यांच्या प्रामाणिकतेची प्रशंसा करत त्यांना कौतुकाची थाप दिली. त्यांच्या या कृतीमुळे बँकेचा विश्वास आणि ग्राहकांचा भरोसा अधिक दृढ झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रेरणादायी घटनांनी खामगाव अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांची सत्यनिष्ठा, पारदर्शकता आणि ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित झाली आहे. अशा कृतींमुळे बँकेची प्रतिमा अधिक उंचावते, असेही उपस्थितांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment