---Advertisement---

जिल्ह्यात शस्त्रसाठ्याची कारवाई

---Advertisement---

खामगांव : जिल्ह्यातील नांदुरा, खामगाव आणि शेगाव या ठिकाणी पोलिसांनी अवैध शस्त्रसाठ्यावर धडाकेबाज कारवाई करत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा तपास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्याचे कामगार कल्याण मंत्री ना. आकाश फुंडकर विशेष उपस्थित राहणार आहेत. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव, शेगाव आणि नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदारही या वेळी उपस्थित राहून अधिकृत माहिती देतील. पत्रकार परिषदेत पोलिसांनी केलेल्या कारवाईविषयी, शस्त्रसाठ्याचा उगम, आरोपींचा शोध आणि तपासाची पुढील दिशा याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

त्यामुळे सर्वांचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे. जिल्ह्यातील शांतता, सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेसाठी ही कारवाई किती निर्णायक ठरेल यावर आज संध्याकाळी पडदा उघडणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment