---Advertisement---

बाळुभाऊ घोराडे यांची विहिंप प्रांत धर्माचार्य सह संपर्क प्रमुख पदी निवड

---Advertisement---

शहरवासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव


शेगांव(युवा क्रांती वृत्तसेवा) : विश्‍व हिंदू परिषदेत कार्यरत असलेल्या आणि सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या चंद्रकांत उर्फ बाळुभाऊ घोराडे यांची विहिंप (विश्‍व हिंदू परिषद) प्रांत धर्माचार्य सह संपर्क प्रमुख या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीने संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

बाळुभाऊ घोराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून, धर्मप्रसार, सामाजिक समरसता, सेवा कार्य आणि संतांच्या विचारांचा प्रचार यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि लोकसंपर्काच्या क्षमतेमुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली असल्याचे विहिंपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  

नवीन पदावर निवड झाल्यानंतर शहरातील नागरिक, हितचिंतक, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी बाळुभाऊ घोराडे यांचे भेट घेऊन व पुष्पगुच्छ देऊन मन:पूर्वक अभिनंदन केले. सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  

विशेष म्हणजे, जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी स्वतः फोन करून बाळुभाऊ घोराडे यांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये सांगितले की, “ही निवड आपल्या संपूर्ण भागासाठी गौरवाची बाब आहे. बाळुभाऊ यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!” 

या निवडीमुळे बाळुभाऊ घोराडे यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या येणार असून, त्यांनी या पदाचा उपयोग धर्मसंवर्धन आणि समाजहितासाठी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शहरात व तालुक्यात सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment