---Advertisement---

जळगांव जामोदमध्ये सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम !

---Advertisement---

आमदार डॉ. संजय कुटे यांचा सक्रिय सहभाग

जळगांव जामोद (युवा क्रांती वृतसेवा) : केंद्र शासनाच्या सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत जळगांव जामोद नगर परिषद यांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात आमदार डॉ. संजय कुटे यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व प्रत्यक्ष साफसफाईच्या कामात सहभाग घेऊन प्रेरणादायी उदाहरण ठेवले.

शहरातील विविध वॉर्डांमध्ये रस्त्यांची साफसफाई, नाल्यांचे स्वच्छीकरण, कचराकुंड्यांचे निर्जंतुकीकरण तसेच प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमात नगर परिषद कर्मचारी, पदाधिकारी तसेच सामाजिक संस्था व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले. काही भागांमध्ये स्वच्छतेसाठी लहान रॅलीचे आयोजनही करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार डॉ. संजय कुटे यांनी सांगितले की, “स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने त्यात सहभागी होणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांद्वारे आपले शहर सुंदर व रोगमुक्त होण्यास मदत होते.” या स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढत असून, जळगांव जामोद शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment