जळगांव जामोद (आकाश बोरसे) : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात विकसित भारत 2047 व स्वच्छता अभियान पंधरवडा अंतर्गत माहिती अधिकार दिन व जागतिक हृदय दिवस निमित्त मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
डॉ. निलेश निंबाळकर यांनी माहिती अधिकार कायदा 2005 हा लोकशाहीचे बलस्थान असून प्रशासन पारदर्शक ठेवण्यासाठी नागरिकांचे महत्त्वाचे साधन असल्याचे स्पष्ट केले. गृहअर्थशास्त्र विभागाच्या प्रा. अर्चना जोशी यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्यासाठी सकस आहाराचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डाबरे यांनी माहिती अधिकार कायदा व निरोगी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनोद बावस्कर यांनी केले तर सूत्रसंचालन पल्लवी माकोडे हिने केले. या वेळी शिक्षक, कर्मचारी व एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.










