मुक्ताईनगर (युवा क्रांती वृतसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपात गंभीर अनियमितता, गळथांग आणि भोंगळ कारभार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
या संदर्भात भाजप उपाध्यक्ष संतोष भीमराव झनके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पंचायत समिती मुक्ताईनगरचे गटविकास अधिकारी यांना सविनय निवेदन सादर केले असून संबंधित जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, शासनाच्या उद्देशानुसार ही योजना समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. मात्र वास्तवात, काही आर्थिक व राजकीय दृष्ट्या प्रभावशाली लोकांनी आपल्या घरातील सदस्यांच्या नावावर चार ते पाच घरकुल मंजूर करून घेतल्याचे आढळून आले आहे.
यामुळे खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज असलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.










