जळगांव जा. (आकाश बोरसे) : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा ‘संकटात संधी शोधण्याची’ आपली ओळख सिद्ध केली आहे. काँग्रेसकडून झालेल्या तांत्रिक आक्षेपांच्या आधारावर भाजपाच्या दोन उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या कुटिल डावाला प्रत्युत्तर देत भाजपाने प्रभाग क्रमांक 7 (ब) मध्ये मोठी राजकीय चाल खेळली आहे.
प्रभाग 7 (ब) मधील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि भावना लक्षात घेऊन, पक्षाने अपक्ष उमेदवार आफरीन नाज नईमउल्लाह खान यांना अधिकृत पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पक्षाच्या या वैचारिक निर्णयानंतर आफरीन नाज यांनी आज माजी मंत्री आ. संजयजी कुटे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे त्या आता अधिकृतरीत्या ‘भाजपा पुरस्कृत उमेदवार’ म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाला जनता आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीने उत्तर देण्याचे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. जळगांव जामोदच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाने पुढील उमेदवारांच्या समर्थनाची घोषणा केली आहे —नगराध्यक्ष पद: गणेश दांडगे (निशाणी : कमळ), प्रभाग क्र. 7 (अ): सुनील रघुवंशी (निशाणी : कमळ) प्रभाग क्र. 7 (ब): आफरीन नाज (भाजपा पुरस्कृत) (निशाणी : बॅट).
जळगांव जामोदचा विकास आणि स्थिर नेतृत्व सुनिश्चित करण्यासाठी या तिन्ही उमेदवारांच्या निशाणीसमोरील बटण दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीने केले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)











