शेगांव | (डी ललित) : शेगांव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप बाळकृष्ण बहुरुपी (वय 36, रा. मेंढळी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) हे दिनांक 5 मार्च 2026 रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास रोकडीया नगर येथील हनुमान मंदिराजवळून जात असताना आरोपी महेश गोपाल गायकवाड हा दोन चाकी वाहनावर दोन साथीदारांसह आला.
यावेळी आरोपींनी कोणतेही कारण नसताना फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने विचारणा केल्यानंतर आरोपींनी अधिक आक्रमक होत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच “जास्त बोललास तर खल्लास करू” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296, 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील ठाणेदार निमिष मेहेत्तरे यांच्या मार्गदर्शनात पोहेका निलेश गाडगे हे करीत आहेत.
🔎 प्रकरणाचा थोडक्यात आढावा
- घटना दिनांक: 05 मार्च 2026
- वेळ: दुपारी 01:30 वाजता
- स्थान: रोकडीया नगर, हनुमान मंदिर परिसर, शेगाव
- फिर्यादी: संदीप बहुरुपी
- आरोपी: महेश गायकवाड व दोन अज्ञात साथीदार
- दाखल तारिक वेळ: दिनांक 19/03/2026 चे 17/04
- पोलीस स्टेशन: शेगांव शहर (युवा क्रांती वृत्तसेवा)







