---Advertisement---

शेगांवात शोककळा : वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे शहराध्यक्ष गणेश देशमुख यांचे निधन!!

---Advertisement---

शेगांव, दि. 27 मार्च 2026 (युवा क्रांती वृत्तसेवा): शहरातील देशमुख समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि प्रामाणिक वृत्तपत्र वितरक म्हणून ओळखले जाणारे श्री गणेशराव शंकरराव देशमुख (वय 76) यांचे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शेगांव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

गांधी चौक परिसरातील श्रावगी ट्रेडर्सच्या मागील बाजूस वास्तव्यास असलेले गणेशराव देशमुख यांनी आयुष्यभर अत्यंत प्रामाणिकपणे वृत्तपत्र वितरणाची सेवा बजावली. त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर समाजसेवेच्या भावनेतून हे कार्य केले. ते शेगांव शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे शहराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते प्रशांत देशमुख व बंटी देशमुख यांचे वडील होत.

👉 अंतिम यात्रा शुक्रवार, दि. 27 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता, त्यांच्या राहत्या घरातून (श्रावगी ट्रेडर्स मागे, गांधी चौक, शेगांव ) निघाली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment