बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा): बुलढाणा, दि. 26 मार्च 2026 जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत अफवा आणि संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आदेश जारी करत पेट्रोल पंपांवरील विक्रीसंदर्भात कडक नियम लागू केले आहेत.
सामाजिक माध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.
📌 आदेशातील प्रमुख मुद्दे
➡️ पेट्रोल किंवा डिझेल खुल्या कॅन, बाटल्या किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये देणे/विकणे पूर्णतः बंद
➡️ इंधनाची विक्री फक्त वाहनांच्या टाकीतच करण्याचे बंधन
➡️ पेट्रोल पंपांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे अनिवार्य
➡️ रुग्णवाहिका (Ambulance) व अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन पुरवठा
➡️ प्रत्येक पंपाने दैनिक शिल्लक साठा व प्राप्त साठ्याची माहिती सार्वजनिकरित्या दर्शवणे आवश्यक
➡️ नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी करू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये
➡️ सर्व पेट्रोल पंप धारकांनी आदेशाचे कठोर पालन करणे बंधनकारक
⚖️ नियमभंग केल्यास कडक कारवाई
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
📢 प्रशासनाचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,
👉 अफवांवर विश्वास ठेवू नये
👉 अनावश्यक गर्दी टाळावी
👉 आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे







