---Advertisement---

शिवसेना संघटन मजबुतीसाठी एकदिलाने काम करा – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन!!

---Advertisement---

चिखली | (आकाश बोरसे) : शिवसेना पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन शिवसेना नेते तथा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. तसेच येत्या 5 एप्रिल रोजी चिखली येथे होणाऱ्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालयात 29 मार्च रोजी तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

🔶 संघटन वाढविण्यावर भर

केंद्रीयमंत्री जाधव म्हणाले की, अनेक पक्षांतील पदाधिकारी व सदस्य हे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. अशा सर्वांना सोबत घेत पक्षाची ताकद वाढवावी.

“प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या सर्कल आणि प्रभागात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

🔶 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सूचना

लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांनी स्वतःची ताकद वाढवून संघटन मजबूत करावे, असेही त्यांनी सांगितले.
महायुतीचे सरकार केंद्र व राज्यात असल्यामुळे कोणत्याही मित्रपक्षाला दुखावेल अशी भाषा वापरू नये, मतभेद टाळावेत आणि एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

🔶 5 एप्रिलला भव्य पक्षप्रवेश सोहळा

येत्या 5 एप्रिल रोजी चिखली येथे शिवसेनेचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे नियोजन काटेकोरपणे करण्याच्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

👥 बैठकीस उपस्थित मान्यवर

या बैठकीस उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, तालुका प्रमुख गजानन मोरे, शहर प्रमुख विलास घोलप, माजी जि.प. सदस्य शरद हाडे, नगर परिषद उपाध्यक्षा वैशाली खेडेकर, शिक्षक सेनेचे वसंतराव गाडेकर यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना व किसान आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment