---Advertisement---

उपक्रमशील शिक्षक वसंत खंडारे यांचा राज्यस्तरीय सन्मान; आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव!!

---Advertisement---

पातुर्डा खुर्द / पुणे, (युवा क्रांती वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2025-26 यंदा पातुर्डा खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक वसंत सदाशिव खंडारे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पुणे येथील निगडी परिसरातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात एज्युकेशन आयकॉन्स समिट 2026 या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार, दि. 29 मार्च रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हस्ते वसंत खंडारे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून निवडक शिक्षकांची काटेकोर प्रक्रियेनंतर निवड करण्यात आली होती. या प्रक्रियेत वसंत खंडारे यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर मानाचे स्थान पटकावले.

वसंत खंडारे हे उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. ते विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते ज्ञान न देता त्यांच्या विचारक्षमता, सर्जनशीलता व आत्मविश्वासाचा विकास करण्यावर विशेष भर देतात. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाबरोबरच नैतिक, सामाजिक व भावनिक विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

त्यांच्या या प्रभावी व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्या कार्याला नवी उंची प्राप्त झाली आहे. त्यांच्या यशामुळे इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment