---Advertisement---

वृत्तपत्र उद्योग वाचवण्यासाठी शासनाकडे ठोस मागण्या; संग्रामपूरात पत्रकारांचे आंदोलन तीव्र !

---Advertisement---

संग्रामपूर (आकाश बोरसे): दि. १ एप्रिल रोजी राज्यातील वृत्तपत्र उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला असून शासनाच्या धोरणांविरोधात संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. तहसीलदारांना निवेदन देत पत्रकारांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या.’व्हॉइस ऑफ मीडिया’ च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असून पत्रकारांमध्ये शासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

📉 वाढते खर्च, मात्र जाहिरात दर ठप्प

पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०११ पासून वृत्तपत्र उद्योगाशी संबंधित कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स, वीज, वाहतूक आणि मनुष्यबळ या सर्व खर्चामध्ये सुमारे १५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मात्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ करण्यात आलेली नाही.

यामुळे लहान व मध्यम वृत्तपत्रांवर आर्थिक संकट ओढवले असून काहींवर बंद पडण्याची वेळ आली आहे.

🗞️ लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात

वृत्तपत्रे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जातात. शासनाच्या योजना व धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य वृत्तपत्रे करत असतानाही शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली.

तसेच सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक वृत्तपत्रांना मोठा फटका बसत असल्याचेही निदर्शनास आणून दिले.

📌 पत्रकारांच्या प्रमुख मागण्या

  • सर्व वृत्तपत्रांसाठी किमान १५०% जाहिरात दरवाढ लागू करावी
  • ई-टेंडर व सर्व शासकीय जाहिराती पूर्णपणे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध कराव्यात
  • प्रत्येक जाहिरातीसाठी किमान २०० चौ. से. आकार निश्चित करावा
  • शासकीय जाहिरातींचे देयक ३० दिवसांत अदा करावे, विलंब झाल्यास व्याज द्यावे

⚠️ आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

या मागण्यांसंदर्भात यापूर्वीही अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली होती. मात्र शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संग्रामपूर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत हे आंदोलन सुरू असून स्थानिक नागरिकांचाही त्याला पाठिंबा मिळत आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन राज्यव्यापी करण्याचा इशारा पत्रकारांनी दिला आहे.

👥 आंदोलनातील प्रमुख सहभागी

या आंदोलनात तालुका अध्यक्ष मिर मकसूद अली, कार्याध्यक्ष दयालसिंग चव्हाण, सचिव सतीश वानखडे यांच्यासह प्रल्हाद दातार, भाऊ भोजने, प्रल्हाद सावतकर, नारायण सावतकर, काशीनाथ मानकर, सचिन पाटील, नंदू शिरसोले, युसूफ शेख, अशोक आकोटकर, कैलास खोट्टे, सुमेध दमधर, बंडू दांडगे, नामदेवराव येऊतकर, सुनील मुकुंद आदी पत्रकार सहभागी झाले होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment