शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा बेपत्ता होण्याचा प्रकार समोर आला असून, शेगांव शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कायमी मिसिंग क्र. 20/2026 अंतर्गत ही नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी ज्ञानेश्वर खंडुजी खाकरे (वय 27, रा. सस्ती वाडेगाव, ता. पातूर, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील खंडुजी पुंडलिक खाकरे (वय 48) हे 1 एप्रिल 2026 रोजी कुटुंबियांसह दर्शनासाठी शेगांव येथे आले होते.
दुपारी सुमारे 12:30 वाजता दर्शन झाल्यानंतर मंदिराबाहेर आल्यावर त्यांनी “मी 10 ते 15 मिनिटांत येतो, तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ थांबा” असे सांगून तेथून निघून गेले. मात्र त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शेगांव शहरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर 4 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:10 वाजता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात दाखल अधिकारी म्हणून मपोका अर्चना उमाळे यांनी नोंद केली असून, तपास अधिकारी म्हणून ग्रेड पोउपनि गावंडे काम पाहत आहेत.
👤 हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन:
- नाव: खंडुजी पुंडलिक खाकरे
- वय: 48 वर्ष
- राहणार: सस्ती, ता. वाडेगाव
- शरीरयष्टी: मध्यम
- रंग: सावळा
- उंची: अंदाजे 5 फूट 4 इंच
- कपडे: पांढरा शर्ट, काळी पॅन्ट
- पायात: काळी चप्पल
- विशेष ओळख: डाव्या हाताच्या बोटावर “भारती” नाव गोंदलेले
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शेगांव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.






