बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी आणि उदयोन्मुख खेळाडूंसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. CB Cup 2026 या भव्य क्रिकेट स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, स्थानिक खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपली प्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण 12 फ्रँचायझी संघ सहभागी होणार असून, तब्बल 48 सामने खेळवले जाणार आहेत. जिल्हास्तरीय क्रिकेटचा हा भव्य उत्सव ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेचे आयोजन अत्यंत व्यावसायिक पद्धतीने करण्यात येणार असून NJ Sports Production टीमकडून 5 कॅमेऱ्यांद्वारे लाईव्ह कव्हरेज करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला ₹1,00,001 इतके रोख पारितोषिक, तर उपविजेत्या संघाला ₹50,001 पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील Man of the Match खेळाडूला स्पोर्ट्स शूज आणि स्पोर्ट्स गॉगल्स भेट दिली जाणार आहेत. याशिवाय, संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूसाठी Player of the Series पुरस्कारासोबत विशेष सरप्राईज गिफ्ट ठेवण्यात आले आहे.
CB Cup 2026 ही केवळ एक स्पर्धा नसून स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्तरावर पोहोचवणारा एक मजबूत प्लॅटफॉर्म ठरणार आहे. सध्या ट्रायल्स आणि खेळाडू नोंदणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू असून, खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेच्या आयोजकांनी जिल्ह्यातील सर्व क्रिकेटपटूंना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
CB Cup Management Team
🎥 Powered by NJ Sports
🏏 CB Cup 2026 Official








