---Advertisement---

शेगावमध्ये 35 वर्षीय युवक बेपत्ता; पोलिसांत मिसिंगची नोंद, शोध सुरू!!

---Advertisement---

शेगांव (युवा क्रांती वृत्तसेवा) : शहरात 35 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी शेगांव शहर पोलिस  स्टेशन येथे मिसिंग नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ रमेश तेल्हारकर (वय 35 वर्ष) हे दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 5 वाजता घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले असून त्यानंतर ते परत आलेले नाहीत.या प्रकरणी त्यांचे वडील रमेश बाळकृष्ण तेल्हारकर (वय 62 वर्ष) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हरविलेल्या युवकाचा मोबाईल क्रमांक 9767662568 असून, संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद येत असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

घटनेनंतर कुटुंबीयांनी नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला, मात्र युवकाचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

📌 हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन:

  • नाव: गोकुळ रमेश तेल्हारकर
  • वय: 35 वर्ष
  • उंची: अंदाजे 5 फूट 6 इंच
  • रंग: गोरा
  • बांधा: मजबूत
  • केस: काळे, दाढी वाढलेली
  • कपडे: पांढऱ्या रंगाचा पॅन्ट-शर्ट
  • ओळख चिन्ह: पोटावर टाचेची खुण
  • मोबाईल: सॅमसंग कंपनी (क्रमांक 9767662568)

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment