---Advertisement---

पळशी झाशी येथे रस्त्यांच्या भूमिपूजनासह उपसरपंचांचा भव्य नागरी सत्कार संपन्न!

---Advertisement---

पळशी झाशी | (आकाश बोरसे) : ग्रामपंचायत पळशी झाशी व बुलढाणा जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य भगतसिंग उर्फ राजुभाऊ पवार यांच्या संकल्पनेतून आणि अथक प्रयत्नांतून श्री शंकरगिरी महाराज विद्यालयासमोरील रस्ता तसेच डॉ. दाणे यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ९ जून रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यानिमित्ताने श्री शंकरगिरी महाराज विद्यालय यांच्या वतीने गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष पद्माकर मारोडे होते. यावेळी युवा उद्योजक कैलास मारोडे, तेजराव मारोडे, राजूमाऊ यांडे, ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, माजी सरपंच अभयसिंह मारोडे, संगीता ताई चितोडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश हेलगे, डॉ. अनंत आमले, उमाकांत कोठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेष सत्कारमूर्ती म्हणून जिल्हा परिषद सदस्य भगतसिंग उर्फ राजुभाऊ पवार, ग्रामपंचायत उपसरपंच श्रीमती पंचफुलाबाई पवार, सौ. वर्षाताई बांगर आणि अमोल दामले (माजी उपसरपंच) यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला समाजसेवक सुजित बांगर, अंगणवाडी सेविका बेबीताई खुमकर करांगळे, कल्पनाताई चितोडे, उज्वलाताई बांगर, शीलाताई गवई, महिला बचत गट प्रमुख चितोडे ताई तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दुगाणे गुरुजी, शिक्षक गणेशराव सांगूनवेडे सर, साहेबराव तायडे सर आणि पुंडकर सर यांनी मोलाचे सहकार्य केले.

गावातील विकासकामांमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून “गाव विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांनी केले. सूत्रसंचालन सांगूनवेडे गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन पुंडकर गुरुजी यांनी केले.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment