---Advertisement---

पत्रकारांचा कथित अपमानप्रकरणी कारवाईची मागणी; व्हॉइस ऑफ मीडियाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन!

---Advertisement---

संग्रामपूर | (आकाश बोरसे) : पत्रकारांचा कथित अपमान केल्याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी व्हॉइस ऑफ मीडिया, संग्रामपूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार संग्रामपूर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करतात. समाजापर्यंत सत्य, अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविण्याची जबाबदारी पत्रकार पार पाडतात. त्यामुळे पत्रकारांविषयी अपमानास्पद अथवा धमकीची भाषा वापरणे ही मुक्त पत्रकारितेवर आघात करणारी बाब असून अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे.

निवेदनानुसार, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांचा कथित अवमान केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधितांकडून पत्रकारांची जाहीर माफी मागविण्यात यावी आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता यावे यासाठी प्रभावी सुरक्षा व्यवस्था व कायमस्वरूपी संरक्षण यंत्रणा उभारण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, मीर मकसूद अली, दयालसिंग चव्हाण, सतीश वानखडे, शेख मतीन, प्रभुदास पारस्कर, कैलास खोटे, सुचित धनबर, अशोक अकोटकार, भगवंता चोरे, हनुमंतसिंग पुरोहित, सुमेध दामोदर, शाम बोरपी, साबीर पठाण, सुनील ढगे, प्रल्हाद सावतकार, युसुफ शेख आणि शेषराव डाखोडे उपस्थित होते.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, पोलीस अधीक्षक बुलढाणा, तहसीलदार संग्रामपूर तसेच व्हॉइस ऑफ मीडिया, बुलढाणा जिल्हा यांनाही देण्यात आल्या.


Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment