संग्रामपूर |(आकाश बोरसे) : दि. १ ऑगस्ट – संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला सरपंच रेणुका पवन वानखडे, ग्रामपंचायत सदस्य आशिष सरदार, गावाचे पोलीस पाटील एकनाथ पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश गाळकर व राहुल सरदार उपस्थित होते.
तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश वानखडे, पवन वानखडे, महादेव वानखडे, अशोक वानखडे, विनोद वानखडे, दीपक वानखडे, राधेश्याम उमरकर, सागर आवचार, आकाश बोरसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. (युवा क्रांती वृत्तसेवा)









