---Advertisement---

Shegaon news:लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती व दैनिक ‘लोक युवा’चा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा ‘लोकनायक पुरस्कार’ देऊन गौरव!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त तसेच दैनिक **’लोक युवा’**च्या वर्धापन दिनानिमित्त शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समर्थ रामदास सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘लोकनायक पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा शाल, मानचिन्ह आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. धनश्री काटीकर (प्रमुख, लोक युवा) या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विजय कुलकर्णी (तरुण भारत), चंद्रकांत घोराळे (भाजप शहराध्यक्ष), अमोल अंधारे (जिल्हाध्यक्ष, शिवसेना) तसेच मेधा सेटवाल (जिल्हा वारकरी अध्यक्षा, बुलढाणा) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि समाजजागृतीच्या विचारांचा जागर करत समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ‘लोकनायक पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमात शेगाव शहरातील पत्रकारांचाही शाल व मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(युवा क्रांती वृत्तसेवा)

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment