---Advertisement---

Shegaon-Bhota Bus Service: शेगाव-भोटा बससेवा पूर्ववत सुरू; मनविसेच्या पाठपुराव्याला यश!!

---Advertisement---

नांदुरा, : (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 5 ऑगस्ट-तालुक्यातील भोटा गावासाठी धावणारी शेगाव आगाराची एस.टी. बससेवा अनेक महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही बससेवा अखेर 5 ऑगस्ट 2026 पासून पूर्ववत सुरू करण्यात आली.

भोटा गावासाठी शेगाव आगाराची सकाळी 10.00 वाजता आणि संध्याकाळी 5.00 वाजताची बससेवा काही महिन्यांपासून बंद होती. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुले आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

या प्रश्नाची दखल घेत मनसे नेते तथा राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर व मनसे जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे जिल्हा उपाध्यक्ष शिवचरण पारस्कर, जिल्हा सचिव राहुल चोपडे आणि मनसे शेगाव तालुकाध्यक्ष नितीश भावरकर यांनी 11 जुलै 2026 रोजी शेगाव आगार प्रमुखांना निवेदन देत बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.

या पाठपुराव्याला यश मिळाल्यानंतर आजपासून बससेवा पुन्हा सुरू झाली असून ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी चालक-वाहकांचे जल्लोषात स्वागत केले.

यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष शिवचरण पारस्कर, जिल्हा सचिव राहुल चोपडे, भोटाचे सरपंच पती कडू भोटकर व माजी पोलीस पाटील विश्वनाथ पारस्कर यांच्या हस्ते चालक व वाहकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. बससेवा पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत मनविसेच्या पाठपुराव्याबद्दल आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment