शेगाव |(डी ललित) : शेगाव बसस्थानकाच्या आऊट गेटसमोरील जनरिक मेडिकलजवळ भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या एसटी बसने चारचाकी वाहन व सायकलला धडक दिल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या अपघातात 14 वर्षीय मुलगी जखमी झाली असून चारचाकी व सायकलीचे एकूण 14 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125(A) व 324(4) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश रामधन वावरे (वय 24, रा. लोहारा, ता. बाळापूर, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी आपल्या चारचाकी वाहनाने जात असताना एमएच 40 वाय 5042 क्रमांकाच्या एसटी बसच्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत चारचाकीच्या मागील उजव्या बाजूला धडक दिली. त्यानंतर बसने कु. वैष्णवी दिनेश अबीलकर (वय 14) हिच्या सायकललाही धडक दिल्याने ती जखमी झाली.
या अपघातात चारचाकीचे अंदाजे 10 हजार रुपये तर सायकलीचे 4 हजार रुपये नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शाम आघाव करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








