शेगाव |(डी ललित) : शेगाव शहर पोलिसांनी कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करत तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेटचा साठा जप्त केला. ही कारवाई 8 ऑगस्ट 2026 रोजी रात्री जगदंबा चौक परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेजवळ, जगदंबा चौक, शेगाव येथे 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.30 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान कोटपा रेड करण्यात आली. या कारवाईत तुषार सुरेश क्षिरसागर (वय 30, रा. ताळी परिसर, शेगाव) याच्याकडून विविध प्रकारचा तंबाखू व सिगारेट असा एकूण ₹320 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये नगिन तंबाखूच्या 8 पुड्या (₹80), रखाल तंबाखूच्या 9 पुड्या (₹90), ठवकर तंबाखूच्या 11 पुड्या (₹110) तसेच H-10 कंपनीच्या सिगारेटची 2 पाकिटे (₹40) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे शेगाव शहर येथे कायमी कलम 6, सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य, उत्पादन व वितरण नियमन) अधिनियम 2003 (COTPA Act) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी म्हणून पोलीस कर्मचारी राणा भारत ओईम्बे (वय 38) यांनी तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही HC गजानन वाघमारे यांनी केली असून, पुढील तपास HC निलेश गाडगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








