---Advertisement---

Shegaon News: शेगावात थुंकी उडाल्याच्या कारणावरून वाद; मारहाण, शिवीगाळ व धमकीप्रकरणी जातीय एनसी दाखल!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील एमएसईबी चौक परिसरात अंगावर थुंकी उडाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व पाहून घेण्याची धमकी दिल्याची घटना 11 ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी जातीय एनसी दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, समीर खान नासीर खान (वय 31, रा. आझाद नगर, शेगाव) यांनी याबाबत तक्रार दिली. तक्रारीनुसार, 11 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास एमएसईबी चौक येथे अंगावर थुंकी उडाल्याच्या कारणावरून दिपक वसंतराव गवई, रा. व्यंकटेश नगर, शेगाव यांच्यासोबत वाद झाला. या वादातून गैरअर्जदाराने चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करून पाहून घेण्या ची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी जातीय एनसी क्रमांक 416/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(1), 352 व 351(2) अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, कोणतेही हत्यार किंवा मुद्देमाल जप्त झालेला नसल्याची नोंद पोलिस अहवालात आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुनील सुसर यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक निमीष मेहेत्रे यांच्या आदेशाने तपास सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment