---Advertisement---

shegaon news : शेगावात सरस्वती कॉलेज परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; ३५५ रुपयांचा माल जप्त!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहर पोलिसांनी सरस्वती कॉलेज परिसरात कारवाई करत तंबाखूजन्य पदार्थांचा ३५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विजय महादेव कोकाटे (वय ५२, रा. गौळखेड रोड, पवारवाडी, शेगाव) यांच्याविरुद्ध COTPA Act-2003 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेदरम्यान शेगाव शहर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सरस्वती कॉलेज परिसरात संशयितावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून विविध प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये नगीण तंबाखूच्या ५ पुड्या, वाल तंबाखूच्या १० पुड्या, गायछाप तंबाखूच्या ५ पुड्या, उंट बिडीची ५ पाकिटे आणि बुढाछाप तंबाखूच्या १२ पुड्या असा एकूण ३५५ रुपये किमतीचा माल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोहेकॉ निलेश अशोकराव गाडगे यांनी फिर्याद दिली असून, सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन) कायदा, २००३ (COTPA Act-2003) अंतर्गत कलम ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश गाडगे करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment