---Advertisement---

Bhimashankar News:भीमाशंकरात ‘हर हर महादेव’चा जयघोष; श्रावणातील शेवटच्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी!

---Advertisement---

भीमाशंकर (युवा क्रांती वृत्तसेवा) : श्रावण महिन्यातील चौथा व शेवटचा सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

श्रावणातील शेवटच्या सोमवारी भगवान भीमाशंकराच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने पहाटेपासूनच विविध भागांतून भाविक येथे दाखल झाले. मंदिरात प्रातःपूजा, अभिषेक व आरती विधी पार पडल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवान महादेवाचे दर्शन घेत जलाभिषेक व पूजाअर्चा केली.

दरम्यान, मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment