आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत राहणार उपस्थित!
शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणींचे त्वरित निवारण करण्याच्या उद्देशाने शेगाव येथे विशेष जनसमस्या निवारण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विश्राम भवन, रेस्ट हाऊस, शेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टी शेगाव शहर व ग्रामीणच्या वतीने आयोजित या उपक्रमात आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश राऊत स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
या जनसमस्या निवारण उपक्रमात नागरी व प्रशासकीय सेवांशी संबंधित अडचणी, तहसील कार्यालयातील प्रलंबित कामे, शैक्षणिक समस्या, आरोग्यविषयक तक्रारी, कृषी विभागाशी संबंधित अडचणी तसेच इतर विविध नागरी समस्यांबाबत नागरिकांना आपली बाजू मांडता येणार आहे.
आपल्या प्रभागातील तसेच गावातील नागरिकांना या उपक्रमाची माहिती पोहोचवावी, तसेच ज्यांची शासकीय अथवा प्रशासकीय कामे प्रलंबित आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली समस्या मांडावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निवारण करून घेण्याचे आवाहन भाजप शेगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले आहे.








