शेगाव(डी ललित): शहरातील भुत बंगल परिसरात 58 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार, दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद शेगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग) म्हणून करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय प्रल्हाद चव्हाण (वय 58, रा. भुत बंगला, शेगाव) यांनी राहत्या घरातील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही घटना दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 11.30 वाजेदरम्यान घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी प्रसाद संतोष डांगे (वय 21) यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून कायम कलम 194 BNSS अन्वये नोंद करण्यात आली आहे.
घटनेचा प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








