---Advertisement---

Shegaon Crime News : शेगावात बसमध्ये अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; तरुणाविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा दाखल!!

---Advertisement---

शेगाव, (डी ललित) : दि. ८ सप्टेंबर- महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी बसने प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शेगाव शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास भारत गॅस गोडाऊन परिसरात घडल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी महाविद्यालय सुटल्यानंतर भोनगाव येथून शेगावकडे जाणाऱ्या बसमध्ये बसली होती. यावेळी आरोपी तरुणही तिच्या मागे बसमध्ये आला आणि तिच्या मागील सीटवर बसला. बस शेगाव-वरवट रोडने जात असताना भारत गॅस गोडाऊनजवळ आरोपीने मागून हात घालून वाईट उद्देशाने तिच्या पोटाला पकडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कायमी भारतीय न्याय संहितेतील कलम 74, 75 तसेच पॉक्सो कायद्यातील कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भामोदकर करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महिला पोलीस अंमलदार अर्चना उमाळे यांनी केली. पोलीस निरीक्षक मेहेत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, प्रकरणाचा पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment