---Advertisement---

Shegaon News : शेगावातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) शेगाव शहरातील जगदंबा नगर परिसरातून १८ वर्षे २ महिन्यांची तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मारोती लहुटे (वय ४९, रा. माळेगाव बाजार, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांनी आपल्या मुलीशी शाळेतील दैनंदिन अभ्यासाबाबत विचारपूस करण्यासाठी फोन केला. मात्र, तिचा मोबाइल स्विच ऑफ असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी शेगाव येथील मुलीच्या खोलीवर जाऊन पाहिले असता ती तेथेही आढळून आली नाही.

मुलगी शाळेतही गेली नसल्याचे चौकशीत समोर आले. तसेच तिच्या मैत्रिणी, नातेवाईकांकडे चौकशी केली असता तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

बेपत्ता तरुणीचा रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची अंदाजे ५ फूट ४ इंच असून गालावर जळाल्याचा डाग आहे. तिचे केस लांब व काळेभोर आहेत. दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ती बेपत्ता झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम १४०(३) BNS अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील सुसर करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment