---Advertisement---

कॉलेजसाठी घरातून निघालेली तरुणी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव (पिंप्री) येथील १८ वर्षीय तरुणी कॉलेजसाठी घरातून निघाल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हरिदास गोल्हर (वय ४५, व्यवसाय शेती, रा. काथरगाव (पिंप्री), ता. संग्रामपूर) यांची मुलगी दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता कॉलेजसाठी घरातून निघाली होती. कॉलेज झाल्यानंतर ती मामाच्या घरी कारंजा येथे जाणार असल्याचे तिने वडिलांना सांगितले होते.

दरम्यान, दुपारी ४ वाजताच्या सुमारास वडिलांनी तिला मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर कारंजा येथील मामाशी संपर्क साधला असता ती त्यांच्या घरी आली नसल्याचे समोर आले. तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता ती कॉलेजच्या गेटबाहेर आल्याचे दिसले होते, मात्र त्यानंतर तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

कुटुंबीयांनी शेगाव परिसरासह नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम १४०(३) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेपत्ता तरुणीचे वर्णन : रंग गोरा, उंची अंदाजे ५ फूट २ इंच, चेहरा गोल, केस लांब. अंगात काळ्या रंगाची जिन्स, राखाडी रंगाचा टॉप, पायात बूट असून तिच्याकडे कॉलेजची काळ्या रंगाची बॅग व Vivo कंपनीचा मोबाइल फोन आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment