---Advertisement---

Shegaon : शेगावात जलसंपदा विभागाच्या पाइपलाइनवरील २.१३ लाखांचे एअर वॉल चोरीला!!

---Advertisement---

शेगाव (डी ललित) : वरवट रोड परिसरातील शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जलसंपदा विभागाच्या भूमिगत रायझिंग मेन पाइपलाइनवरील तब्बल २ लाख १३ हजार २८८ रुपये किमतीचे चार एअर वॉल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामेश्वर गणेशराव ठाकरे (वय ५२, व्यवसाय नोकरी, रा. जलपुर्णा वसाहत, नेहरू पार्कजवळ, अकोला) हे उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्यापूर्वी वरवट रोड, शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील बोर्ड परिसरापासून शेगावकडे जाणाऱ्या रायझिंग मेन पाइपलाइनवरील चार एअर वॉल चोरीला गेल्याची माहिती त्यांना मिळाली.

जलसंपदा विभागामार्फत शेतीच्या सिंचनासाठी जिंगाव उपसा सिंचन योजना क्रमांक ७ अंतर्गत भूमिगत रायझिंग मेन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. या पाइपलाइनवरील प्रत्येकी ५३ हजार ३२२ रुपये किमतीचे चार एअर वॉल, असे एकूण २ लाख १३ हजार २८८ रुपये किमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, चोरीस गेलेले एअर वॉल खामगाव शहर पोलिसांनी आरोपीसह पकडल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर या घटनेप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.१४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमारे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment