---Advertisement---

buldhana : चंद्रशेखर आजाद यांच्यावरील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करा; Z+ सुरक्षा द्या-सुजित बांगर!!

---Advertisement---

बुलढाणा (आकाश बोरसे) : आजाद समाज पार्टी (कांशीराम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांना शाहाबाद येथील टोल गेटवर अडवून कथितरित्या झालेल्या हल्ल्याची निष्पक्ष, उच्चस्तरीय आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींकडे देण्यात आले. विद्यमान खासदारावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही गंभीर बाब असून, या घटनेची केवळ प्राथमिक पातळीवर चौकशी न करता हल्ल्यामागील संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कायद्यानुसार तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच या घटनेमागे कोणाचा दबाव, कटकारस्थान किंवा सूत्रधार आहे का, याचाही तपास करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

भाई चंद्रशेखर आजाद यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने आढावा घेऊन त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशीही मागणी सुजित बांगर यांनी केली आहे. लोकशाही, संविधानिक मूल्ये आणि राजकीय अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याने केंद्र व संबंधित राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आजाद समाज पार्टीकडून लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी पंकज शेगोकार, शेख आबेद, महादेव जाधव, विजय इंगळे, सागर मोरे, सिद्धांत तायडे, सोपान दाभाडे, अभिजीत कांबळे, संदेश वानखडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या निवेदनावर आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment