---Advertisement---

Shegaon : शेगावात नकली नोटांच्या व्यवहारातून फसवणुकीचा प्रयत्न; ५ लाखांच्या बनावट नोटा देण्याचा आरोप!!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : शेगाव शहरातील बसस्थानक परिसरात नकली नोटांच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम 318(4), 318(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय अनिल गवई (वय 23, रा. कंचनपूर, ता. खामगाव) यांच्या तक्रारीवरून फैयाज अहेमद राज मोहमंद (वय 30, रा. छोटा मोमिनपुरा, बाळापूर, जि. अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता पवन मेडिकलजवळ, बसस्थानक परिसर, शेगाव येथे ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीला शेगाव येथे बोलावून पाच लाख रुपयांच्या बनावट 500 रुपयांच्या नोटा देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या नोटांवर ‘भारतीय चिल्ड्रेन बँक’ असे लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात पोलिसांना एकूण पाच बंडल मिळाले असून त्यामध्ये ‘भारतीय चिल्ड्रेन बँक’ असे लिहिलेल्या 500 रुपयांच्या एकूण 999 नोटा आढळल्या. तसेच एका बंडलच्या वरच्या बाजूस 500 रुपयांच्या भारतीय चलनातील दोन असली नोटा मिळून एकूण 1,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून 2 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्री 12.05 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल अधिकारी म्हणून मपोहेका चारुशिला गवई यांनी कारवाई केली असून, पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप बारिंगे करीत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment